सर्वांचे अंदाज चुकवत मान्सून अंदमानसह बंगालच्या उपसागरात दाखल, महाराष्ट्रात ‘या’ दिवशी पडणार पाऊस

पुणे : सध्या सर्वांचे लक्ष पावसाकडे लागले आहेत. असे असताना आता मागील वर्षी मान्सूनचे अंदामानात आगमन 22 मे रोजी झाले होते. मात्र, तो यंदा 20 मे पर्यंत येईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.
आता सर्वांचे अंदाज चुकवत मान्सून 19 मे रोजी दुपारी 2 च्या सुमारास दाखल झाला. तत्पूर्वी चोवीस तास आधी त्या भागात पावसाला सुरुवात झाली होती. हवामान विभागाने शुक्रवारी दुपारी ही सुखद वार्ता दिली. यामुळे शेतकरी सुखावला आहे.
मान्सून अंदमान सागरासह बंगालच्या उपसागरातही दाखल झाला असून तो वेगाने प्रगती करतो आहे. यापुढे तो बंगालच्या उपसागरासह अंदामान व निकोबार बेटांवर सर्वत्र पुढे जाईल, असे हवामान विभागाने सांगितले.
असे असले तरी तो केरळात 4 जून रोजीच येणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ.के.एस.होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.