‘तुला संपवून टाकू…’ दीपाली सय्यद यांना महिला नेत्याची धमकी; राजकारणात मोठी खळबळ


नाशिक : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांना एका महिला नेत्याकडून गंभीर धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “तुला संपवून टाकू” अशा थेट शब्दांत धमकी देण्यात आल्याचा आरोप केला जात असून, या प्रकरणामुळे राजकारण आणि मनोरंजन क्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण वाद नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात यांच्या आयुष्यावर आधारित तयार होणाऱ्या एका चित्रपटाशी संबंधित आहे. या चित्रपटात दीपाली सय्यद महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. मात्र या प्रोजेक्टमध्ये काम करू नये यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एका महिला नेत्याने फोन किंवा मेसेजद्वारे थेट धमकी दिल्याचे सांगितले जात असून, “जर या चित्रपटात काम केले तर तुमची राजकीय कारकीर्द संपवू” असा इशाराही देण्यात आल्याचे समोर आले आहे.

या धमकीनंतर राजकीय वातावरण तापले असून, विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात कोणतीही अधिकृत पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, दीपाली सय्यद यांनी या संपूर्ण वादावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, त्या या चित्रपटाच्या निर्माती नाहीत. “भोंदूबाबा अशोक खरात यांच्याबाबत मला सुरुवातीला कोणतीही माहिती नव्हती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर मला या प्रकरणाची माहिती मिळाली. हा चित्रपट माझा नाही, मी फक्त कलाकार म्हणून यात काम करत आहे,” असे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, “लवकरच मी या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.” तसेच रुपाली ताईंबरोबर झालेल्या प्रकरणाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली असून, ते प्रकरण अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या संपूर्ण घटनेमुळे आता राजकीय दबाव, धमकी, आणि चित्रपटातील सहभाग यावरून नवा वाद निर्माण झाला असून, पुढे हा विषय आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस तपास किंवा अधिकृत तक्रार झाल्यास या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळू शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!