राज्य सरकारचा मोठा निर्णय!! आता सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक, इंग्रजी शाळांवर होणार कारवाई…


पुणे : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार आहे, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे. दादा भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाबद्दल काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

त्यांनी शिक्षण विभागाची पुढील वाटचाल कशी असेल, त्यासाठी काय करावे लागेल याबद्दल विविध घटकांची चर्चा करत असल्याचे सांगितले आहे. शालेय शिक्षण विभागाचा रोडमॅप लवकरच तयार केला जाईल, असेही ते म्हणाले. यामुळे येणाऱ्या काळात अनेक बदल होणार आहेत.

काही वर्षांपासून अनेक इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डाच्या शाळांकडून मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ केली जात होती. नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी हा विषय पर्यायी करण्यात आल्याची चर्चा रंगली होती, आता मात्र अशा या शाळांवर आता कारवाई होणार आहे.

दरम्यान, केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य आहे. यातून त्यांना कोणतीही पळवाट काढता येणार नाही. मराठी भाषेच्या अध्यापनाला अधिकाधिक व्यापक करण्यासाठी त्या शाळेतील शिक्षकांनाही मराठी भाषेचे ज्ञान असायलाच हवे, असेही दादा भुसे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, येत्या आठ दिवसात शालेय शिक्षण विभागाच्या धोरणाचा रोड मॅप समोर आणला जाईल. शालेय शिक्षण विकासाचा एक दशसूत्री कार्यक्रम जाहीर करून तो राबवला जाईल, असेही ते म्हणाले. येत्या शालेय वर्षात हे बदल दिसणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!