लाडक्या बहिणींना १ एप्रिल २०२५ नंतर मिळणार २१०० रुपये ; परंतू लाडक्या बहिण येणार निकषांच्या कचाट्यात ….

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा महायुतीला झाल्याचे चित्र आहे. मात्र आता महायुती सरकार सत्तेत येण्यापूर्वी लाडक्या बहिण योजनेत काही बदल करण्यात येण्याचा हालचाली सुरू आहेत.
महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना प्रतिमाह १५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांना आता त्या २१०० रुपयांची प्रतीक्षा लागली असून आगामी महिन्यापासून ६०० रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. परंतु या योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होणार आहे. त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर १ एप्रिलपासून दरमहा १५०० ऐवजी २,१०० रुपये दिले जाणार असल्याची माहिती आहे.
खालील निकषांची पडताळणी होणार:
*योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का?
*लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का?
*एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का?
*परितक्त्या, विधवा, निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का?