Daund News : आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना अखेर यश! दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय…
Daund News दौंड : दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय करण्याचे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिले होते. अखेर कुल प्रयत्नांना अखेर यश आले आहे. दौंड तालुक्याकरीता स्वतंत्र उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय सुरु करण्याबाबतचा निर्णय आज शासनाने प्रसिद्ध केला आहे. Daund News
आपल्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आणि दौंड येथे स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरु होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. दौंड येथे प्रांत कार्यालय व्हावे यासाठी आपण गेले अनेक वर्षे आग्रही होतो, आपल्या मागणीनुसार आमचे नेते, आधारस्तंभ देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात दौंड तालुक्याकरीता स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरु करण्यास मंजुरी दिली होती.
तसेच त्यानंतर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री कनाथराव शिंदे साहेब, महसूल मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी या प्रक्रियेला गती देण्यास मोलाची मदत केली, आज सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन दौंड तालुक्याकरीता स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरु करण्याच्या निर्णय झाला याचा मला मनस्वी आनंद आहे . असे राहुल कुल म्हणाले आहे.
दौंड तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल दौंड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील , चंद्रकांत पाटील यांचे तसेच महायुती शासनाचे मनःपूर्वक मानत असल्याचेही आमदार कुल यांनी सांगितले.