Daund : माजी आमदार रमेश थोरात शरद पवार गटात, उमेदवारीही ठरली, राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात यांची लढाई आता निश्चित…

Daund : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच घडामोडींना वेग आला आहे. याच पार्शभूमीवर दौंड तालुक्यात अखेर आमदार राहुल कुल विरुध्द माजी आमदार रमेश थोरात अशीच पारंपरिक लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज अखेर दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला. आज (ता.२८) सकाळी रमेश थोरात हे शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेत आले होते.
त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार असून शरद पवार देतील तो निर्णय मान्य करू असे रमेश थोरात यांनी सांगितले होते. मात्र शरद पवारांची भेट घेतल्यानंतर तिथेच पक्ष प्रवेश देखील झाला आणि त्यांना एबी फॉर्म देऊन ची उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. Daund
दरम्यान, त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी तासगावचे युवा नेते रोहीत आर. आर. पाटील उपस्थित होते. तासाभरात एबी फॉर्म न्या असे सुळे यांनी आपणाला सांगितले आहे. दौड मध्ये राष्ट्रवादीच्या नाराजांशी बोलून समजूत काढू असे थोरात म्हणाले.
आता दौंड तालुक्यात आमदार राहुल कुलविरुद्ध माजी आमदार रमेश थोरात अशी अटीतटीची लढत होईल. शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे रमेश थोरात यांच्या समर्थकांना हत्तीचे बळ आले असेल.