Daund : सुनेला देवदासी बनवायचा प्रयत्न, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हाणून पाडला डाव, दौंडमध्ये धक्कादायक प्रकार…

Daund : दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका गावात एका उच्चशिक्षित कुटुंबातील विवाहित महिलेच्या देवी-देवता अंगात येत असल्याने जागरण गोंधळाचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करुन तिला पोतराजासोबत देवदासी बनविण्याचा प्रकार सुरू होता.
याबाबत माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संबंधित विवाहित महिलेची आई, भाऊ, बहिण, नातेवाईक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि फुले शाहू आंबेडकर चळवळीचे सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या मदतीने हा प्रकार रोखला आहे.
सध्या शिक्षित झालेल्या वर्गामध्येच सर्वात जास्त अंधश्रद्धा असून हाच वर्ग याला जास्त बळी पडत आहे। यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. अंधश्रद्धेला बळी पडुन कर्मकांड करून एका विवाहित महिलेला पोतराज सोबत देवदासी बनवण्याचा प्रयत्न दौंड तालुक्यातील एका गावात सुरू होता. यामुळे शिक्षित पुणे जिल्ह्यात अस चित्र असेल तर इतर ठिकाणी परिस्थिती कशी असेल याचा अंदाज येतो. Daund
दरम्यान, ही महिलाही शिक्षित असून सासर आणि माहेरही दोन्ही कुटुंबे उच्चशिक्षित. सासरच्या मंडळींकडुन या विवाहीत महिलेला काही धार्मिक कर्मकांड करण्यास जबरदस्तीने भाग पाडले जात होते. नंतर हा प्रकार महिलेने आपल्या आई, भाऊ – बहिण आणि इतर नातेवाईकांना सांगितला. या सर्वांनी सासरच्या मंडळींना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र काही उपयोग होत नव्हता.
नंतर संबंधित महिलेच्या आई आणि नातेवाईकांनी पुणे येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला कार्यकर्त्यांंशी संपर्क साधुन सदर प्रकाराची व्हिडिओ पाठवुन माहिती दिली. यामुळे पोलीस देखील याठिकाणी आले. याचा व्हिडिओ
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक व पत्रकारांनाही व्हिडिओ माहिती आणि हा प्रकार सांगितला.
ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी य स्थानिक पोलिसांना याबाबत चौकशी चे आदेश दिल्याने स्थानिक पोलीसांनी तत्काळ चौकशीचे सुत्रे हलवली आणि संबंधित कुटुंबांना पोलीस चौकीत बोलवले. तसेच याबाबत माहिती घेऊन हा प्रकार रोखला आहे.