Daund : दुधाला ४० रुपये दर, आणि कांद्याची निर्यातबंदी उठाव, शेतकरी संघटनेचा सरकारला इशारा, दिला एका महिन्याचा अवधी…


Daund : गेल्या काही महिन्यापासून दुधाचे दर खूपच खाली आले आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आता राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४० रुपये दर दिला पाहिजे, दोन साखर कारखान्यांमधील अंतर किती असावे याचा आदेश काढावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

तसेच सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी असा अनेक प्रलंबित मागण्या मान्य करावेत. यासाठी सरकारला एक महिन्याचा अल्टीमेटम देत आहोत. असा इशारा रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे नेते शिवाजीराव नांदखिले यांनी दिला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत दौंड येथे शेतकरी संघटना व माजी सैनिकांची बैठक झाली. यावेळी हा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शेती प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दोन साखर कारखान्यांमधील अंतराचे आदेश काढा, नाहीतर पाच हजार रुपये प्रति टन उसाला भाव द्यावा, दुधाचा दर किमान 40 रुपये प्रति लिटर द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच सरकारने जाहीर केलेल्या दुधाला लिटरला पाच रुपयाचे अनुदान अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाही, ते ताबडतोब द्यावे, कांद्यासह सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी काढून टाकुन प्रदेशातील बेकायदेशीर शेतीमाला आयातीवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली. यामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतीमालाला बाजार नसल्याने शेतकऱ्यावर कर्जचा मोठा डोंगर आहे. विज बिल थकले आहेत. सरसकट सर्व कर्ज व विज बिल मुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सरकारने सरकारी शाळा बंद करून खाजगी शाळा यांच्याच बगलबच्चासांठी काढलेल्या आहेत. Daund

त्याची फी गरीब शेतकरी व शेतमजुरांना या खाजगी शाळांच्या फी भरणे गळ्याशी आलेले आहे. म्हणून खाजगी शाळांची फी 50% कमी करावी, माजी सैनिकांचे प्रश्न, वीर विधवा पत्नींचे प्रश्न प्रलंबित आहेत. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेचे नेते, क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, मेजर नारायणराव अंकुश हे उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!