Cyber Fraud : एक व्हिडीओ कॉल आणि महिलेच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज, १९ लाखांची फसवणूक, नेमकं घडलं काय?


Cyber Fraud : नागरिकहो सावधान.. तुमच्या खात्यावर रक्कम नसली तरी तुमचे बँक खाते व इतर कागदपत्राद्वारे तुमच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढून फसणूक केली जात आहे. सध्या अशीच घटना वाकड येथून समोर आली आहे.

तैवानला पाठविलेले पार्सल मुंबईत नार्कोटिक्स विभागाने पकडले आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी नार्कोटिक्स विभागाला फोन जोडल्याचे सांगून महिलेला स्काईपवरून व्हिडीओ कॉल करण्यात आला. महिलेला बँकेचे उपयोजन चालू करण्यास सांगितले. त्याद्वारे महिलेच्या नकळत १९ लाखाचे कर्ज मंजूर करून ती रक्कम वळती करून घेत फसवणूक केली.

याप्रकणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल धारक आकाश कुमार, अमनी कोंडाल, कर्ज वळती करून घेतलेले बँक खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिलेला आकाश नावाच्या व्यक्तीने फोन करुन तैवानमध्ये पाठवलेले पार्सल मुंबई येथील नार्कोटीक्स विभागामध्ये अडकले असल्याचे सांगितले. फोन नार्कोटिक्स विभागाला जोडत असल्याचे सांगून महिलेचे बँक खाते तपासायचे आहे, असे सांगितले. Cyber Fraud

दरम्यान, यावेळी फिर्यादीला स्काईपवरून व्हिडिओ कॉल करून त्यांची कागदपत्रे व बँक खात्याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी फिर्यादीच्या नावे १९ लाख ४ हजार १०१ रुपयाचे पर्सनल लोन काढले.

त्यानंतर हे लोन फिर्यादीच्या खात्य़ावर येताच त्यांनी बेनिफिशरी बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!