कियारा- सिद्धार्थच्या घरी गोंडस बाळाचे होणार आगमन, चाहत्यांना दिली गोड बातमी..

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या घराचा दरवाजा एक छोटासा पाहुणा ठोठावणार आहे. या जोडप्याने चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. लवकरच ते आई-बाबा होणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे

त्यांच्या पोस्टने चाहत्यांना खुश करून टाकले आहे. कियाराने इन्स्टाग्राम अकाऊंटवर बाळाच्या पायातील मोज्यांचा फोटो पोस्ट केला आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या हातात हे मोजे दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, आमच्या आयुष्यातील सर्वांत मोठी भेट लवकरच येत आहे…
कियाराने हा फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. याशिवाय, चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सही या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. सोनू सूदपासून ते नेहा धुपिया, करण जोहर, हुमा कुरेशी, गौहर खानपर्यंत सर्वजण या पोस्टवर कमेंट करत आहेत.

धर्मा मूव्हीजच्या अकाउंटवरून एक टिप्पणी आली आहे, ‘कायमस्वरूपी बुकिंग?’ कृपया हे तीन लोकांसाठी करा. नेहा धुपियाने लिहिले आहे की, ‘तुम्हा दोघांचेही अभिनंदन. तुम्ही खूप सुंदर बातमी दिली आहे.’ असे लिहून अनेक कलाकारांनी प्रतिसाद दिला आहे.
