Crime News : अपहरण करून बलात्कार, ४ वर्षांच्या चिमुकलीसोबत भयंकर कृत्य, नाशिकमध्ये घडली धक्कादायक घटना..


Crime News : बदलापुरात दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

आरोपी टिल्लू उर्फ प्रकाश एकनाथ अहिरे (वय. २६) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. १९ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आली आहे. फिर्यादीनुसार तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात अवघ्या साडेचार वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक समोर आली. चिमुकली घरासमोर खेळत असताना आरोपीने तिचे अपहरण केले. वावी या गावात राहणाऱ्या नराधमानेच हे कृत्य केल्याचं उघड झाले आहे. Crime News

मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर मुलीची सुखरुप सुटका केली आहे. या संशयित आरोपीविरोधात वावी पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!