Crime News : औरंगजेबाचे स्टेटस ठेवणार्या दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Crime News : किंग ऑफ हिंदुस्तान असे म्हणून इंस्टाग्राम मिडीयावर स्टोरी करत औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठेवलेला स्टेटस इतर लोकांना पाठवून लोकांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्बास मोमीन व साहिल शेख या असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी अविनाश दळवी यांनी फिर्याद दिली आहे. Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अरबाज अब्बास मोमीन व साहिल शेख यांनी शुक्रवारी (ता. 3) इंस्टाग्रामवर ‘किंग ऑफ हिंदुस्तान अबुल मुजाफर मुही उद दीन मोहम्मद औरंगजेब आलमगिर’ असे लिहून त्याखाली औरंगजेबाचा फोटो ठेवून त्याखाली स्टोरी ठेवली.
तसेच १६ सेकंदांचा औरंगजेबाचा व्हिडिओ तयार करून ‘नाम बदलने से इतिहास नही बदलता’ असा मजकूर ठेवला. तो इतर लोकांना पाठवून लोकांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला. सध्या सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू आहे.
या काळात वरीलप्रमाणे कृत्य केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष साळुंके करीत आहेत.