Crime News : खुटबाव येथे मटका अड्ड्यावर छापा, तिघांवर गुन्हा दाखल, यवत पोलिसांनी कारवाई…

Crime News : खुटबाव (ता. दौंड )येथे मटका घेणाऱ्या इसमावर कारवाई करून ३,३१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी तीन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई यवत पोलिसांनी केली आहे.
राजेंद्र यादव घोडके (वय ५० वर्षे, रा. खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे), राजकुमार दगडुलाल शर्मा (वय ६६ वर्षे, रा. बोरीपार्धी, बेथल कॉलनी, ता. दौंड, जि.पुणे ) गोटु पवार (रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना खुटबाव, (ता. दौंड, जि. पुणे) या गावच्या हद्दीमध्ये इंदीरानगर येथे दोन इसम कल्याण मटका नामक जुगाराची साधने जवळ बाळगुन आपल्या ओळखीच्या लोकांकडुन पैसे घेऊन मुंबई मटका हा जुगार खेळवित असल्याची माहिती मिळाली होती. Crime News
यावेळी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सहा. फौजदार गोविंद भोसले, पोलीस हवालदार पोलीस हवालदार गुरू गायकवाड, राम जगताप, महेद्र चांदणे, पोलीस नाईक निखील रणदिवे यांच्या पथकाने कारवाई केली.
खुटबाव च्या हद्दीत असणाऱ्या इंदीरानगर येथे जावुन अचानक छापा टाकला असता या ठिकाणी राजेंद्र घोडके, राजकुमार शर्मा यावेळी त्यांच्याजवळ कल्याण मटका जुगाराची साधने व रोख रक्कम असा एकुण ३,३१० रुपये किंमतीचा मुद्देमाल माल मिळुन आला.
वरील आरोपिंनी मटक्याचे सर्व पैसे गोळा करून गोटु पवार याच्याकडे जमा करीत असलेबाबत सांगितले. त्यामुळे वरील आरोपी आणि गोटु पवार या तिघांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.