Crime News : धक्कादायक! उद्धव ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या, पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ..


Crime News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभागप्रमुख विजय थोरी यांच्या मुलाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या देहूरोड परिसरात घडली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख विजय थोरी यांच्या मुलाचा काल मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला आहे.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे

विशाल विजय थोरी असे या २३ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय देहूरोड पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास नगर येथे रात्री १ वाजेच्या सुमारास विशाल थोरी याच्यावर चार ते पाच जणांच्या टोळक्यांने हल्ला केला. त्याच परिसरातील चार ते पाच तरुणांची विशालवर जीवघेणा हल्ला केला. Crime News

विशालला काही कळण्याच्या आतच त्याच्यावर दगड लाठ्याकाठ्यांनी हल्ला केली. विशालच्या डोक्यामध्ये व तोंडावर कुंडी मारली. सिमेंटचा गट्टू व लाकडी बांबूने मारहाण करून त्याला जीवे मारले. सर्व आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

विकासनगर किवळे भागात असलेल्या श्री साई दर्शन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जवळच अज्ञात लोकांनी विशालची दगडाने ठेचून हत्या केली आहे. विशाला मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांना गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!