Crime News : कोरेगावमूळ येथे बड्या उद्योजकाने अर्थिक रक्कमेच्या वादातून केला गोळीबार, घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर..


Crime News उरुळी कांचन : रिंगरोड जमिनीच्या व्यवहारातील पैशांच्या वादातून दोन जणांवर एका उद्योजकाकडून गोळीबार केल्याची घटना उघडकीस केली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

ही घटना शनिवारी (ता.१४) रोजी कोरेगाव मुळ (ता.हवेली) येथील इमानदार वस्ती येथे घडली आहे. जखमींवर लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सविस्तर माहिती अशी की, हवेली तालुक्यांतील ग्रामीण पोलीस दलातील ऊरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव मुळ हद्दीतील इमानदार वस्ती येथील एका बड्या उद्योजकाच्या घरात रिंगरोडच्या जमिनीमध्ये गुंतवणूक केलेले पैसे मागण्यासाठी दोन तरुण गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद होऊन त्याचे पर्यावसान गोळीबारात झाले.

या वादात उद्योजकाने आपल्या पिस्तुलातून दोन राऊंड फायर केले असुन, पायावर व पाठीवर गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल..

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उद्योजक, राजकारणी व अधिकारी यांची करोडो रुपये अडकल्याची चर्चा…

गोळीबार केलेला उद्योजक हा रियल इस्टेटमध्ये कार्यरत आहे. या उद्योजकाने रिंग रोडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. तसेच त्याने पैशाची गुंतवणूक करुन मोठा परतावा मिळावा म्हणून अनेकांकडून करोडो रुपये घेतल्याची चर्चा आहे.

त्याने अनेकवेळा या गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा परतावा दिल्याने त्याच्याकडे करोडोंची गुंतवणूक झाल्याची चर्चा आहे. या परतावा देण्यामुळे त्याचे ग्रहमान फिरले असून त्याच्याकडे गुंतवणूकक्षकेलेले करोडो रुपये अडकून पडल्याची चर्चा आहे. हवेलीतील बडे उद्योजक, अधिकारी व राजकारणी यांची मोठी रक्कम त्याच्याकडे असल्याची चर्चा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!