Crime News : चोरट्यांची अनोखी चोरी, आता धावत्या ट्रकमधून १.८ लाखांचे शेंगदाणे बियाणे केले लंपास..
Crime News : धाराशिव जिल्ह्यातून जाणा-या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर धावत्या वाहनातून किंमती साहित्याची चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत. हे चोरीचे प्रकार वाशी तालुक्यातील सरमकुंडी फाटा ते तेरखेडा या दरम्यान वारंवार होत आहेत.
या भागात विशिष्ट समाजाचे लोक रहात असून ते लुटमारीचे प्रकार करत असल्याचे पोलीस तपासात अनेकवेळा उघड झाले आहे. धावत्या ट्रकमधून ताडपत्री फाडून एक लाख आठ हजार रूपये किंमतीचे शेंगदाणा बियाणे चोरट्यांनी लंपास केले आहेत. या प्रकरणी वाशी पोलीस ठाणे येथे १३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Crime News
मुन्शी प्लॉट, उमरगा येथील ट्रक चालक इम्रान हबीब शेख हे, साबरकांता, गुजरात येथून ट्रकमध्ये शेंगदाणा बियाणे घेऊन ऑईल मिल नागरकरनुल येथे जात होते. त्यांचा ट्रक सरमकुंडी फाटा ते इंदापूर साखर कारखाना दरम्यान आला असता चोरट्यांनी ट्रकची रस्सी कट करुन ताडपत्री फाडुन आतील १८ कट्टे शेंगदाणा बीयाणे लंपास केले.
दरम्यान, त्याची किंमत अंदाजे १ लाख ८ हजार रूपये आहे. या प्रकरणी इम्रान शेख यांनी दि.१३ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पोलीस ठाणे येथे कलम ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोदाखल करण्यात आला आहे.