Crime News : पुणे- सोलापूर महामार्गावर गोमांसचे कंटेनर पोलिसांनी केले जप्त, दौंड तालुक्यात केली मोठी कारवाई..

Crime News : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून हैदराबादहून मुंबईला कंटेनरमधून २९ हजार गोमांस घेऊन जात असताना हा कंटेनर दौंड तालुक्यातील खडकी येथे एका ढाब्याच्या परिसरात ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी ( ता.१९ ) रात्री करण्यात आली आहे.
या गोमांसची बाजारातील किंमत ४७ लाख २० हजार रुपये असून १२ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ५९ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
सविस्तर माहिती अशी की, हैदराबाद येथून गाई व म्हशीचे गोमास घेऊन एक कंटेनर पुणे सोलापूर मार्गाने मुंबईकडे निघाल्याची माहिती गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन (रा. महादेव नगर उरुळी कांचन, ता. हवेली ) यांना मिळाली होती. हा गोमासचा कंटेनर भिगवणच्या (ता. इंदापूर ) पुढे निघाल्याची माहिती कांचन यांना मिळाल्यानंतर त्यांनी या संदर्भात दौंड पोलिसांशी संपर्क साधला.
माहिती अनुसार पोलीस गोरक्षकासह खडकी येथील आकांक्षा ढाब्याच्या परिसरात सदरचा कंटेनर उभा असल्याचे निदर्शनास आले. कंटेनर चालकाकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने कंटेनरमध्ये गोमास असल्याची कबुली दिली. Crime News
ताब्यात घेतलेल्या १८ टायर कंटेनरची वहन क्षमता २८.८० पण असताना त्यामध्ये २९ टना पेक्षा जास्त गोमास वाहतूक करताना पोलिसांना आढळून आले. यामध्ये २५ हजार किलो गायी व इतर प्राण्यांचे गोमास तर ४ हजार किलो म्हशीचे गोमास आढळून आले.
याची अनुक्रमे बाजारात किंमत १६० व १८० रुपये प्रति किलो आहे. या गोमासशी बाजारातील किंमत ४७ लाख २० हजार आहे. तर ताब्यात घेतलेल्या कंटेनरची किंमत १२ लाख आहे. गोमांस व टेम्पो असा एकूण ५९ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.