Crime News : बुलढाण्यात भीम जयंतीला गालबोट! चाकूहल्ल्यात युवक ठार, घटनेने उडाली खळबळ…

Crime News बुलढाणा : शहरात रविवारी भीम जयंती मिरवणुकीदरम्यान एकांतातील जागेत एका युवकाची चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आली आहे. यामुळे शांततेत पार पडलेल्या जयंती उत्सवाला गालबोट लागले आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.
शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कन्या शाळेच्या अंधारलेल्या परिसरात १४ एप्रिलला रात्री अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
आशुतोष संजय पडघन (वय. २४ ) असे मृताचे नाव आहे.
जुना वाद किंवा मिरवणुकीत झालेल्या खडाजंगीमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. शहर पोलिसांना माहिती मिळताच आशुतोषला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. Crime News
Views:
[jp_post_view]