Crime News : महिलेने शरीर संबंधास दिला नकार, रागात महिलेचा केला खून, पुरावा नष्ट करण्यासाठी सगळा ऊसच पेटवला…


Crime News : देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

शारीरिक संबंधास विरोध केल्याने भादवण (ता. आजरा) येथील महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आशाताई मारुती खुळे (वय ४२, रा. भादवन, ता. आजरा) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना लक्षात घेऊन नये म्हणून उसाचा फड पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी काशिनाथ नारायण खुळे (वय ४६, रा. भादवण, ता. आजरा) यांनी आजरा पोलिसांत तक्रार दिली असून योगेश पांडुरंग पाटील (वय ४६, रा भादवण, ता.आजरा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आशाताई ही योगेश पाटील याच्या बरोबर दिसली होती. योगेशने भादवण- भादवणवाडी रस्त्यावर असाणाऱ्या शिवार नावाच्या दिपक खुळे, आनंदा देवरकर यांच्या उसाच्या शेतात नेले. तेथे पिडितेवर अतिप्रसंग करण्याचा त्याने प्रयत्न केला.

पिडितेने नकार दिल्याने तिचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने ऊसाचा फड जाळून टाकला. आगीमुळे मृतदेह जळून खाक होईल असा अंदाज होता. मात्र मृतदेह अर्धवट जळाल्याने ही महिला गावातील असल्याचे ग्रामस्थांना समजले. सदर घटना घडल्यानंतर आजरा पोलिसांनी तपासची चक्रे फिरवली. गावातील सीसीटीव्ही फुटेजची तपासरणी केली. Crime News

दरम्यान पोलिसांना खास बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून गावातील टॅक्टर चालक योगेश पाडूरंग पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिली.

दरम्यान, आशाताई खुळे हिला बोलावून ऊसाच्या शेतात नेले होते, प्रथम तिने शरीर सुखास नकार दिल्याने तिचा गळा आवळून तिचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने ऊस पेटवून दिल्याची योगेश पाटील याने कबुली दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!