Crime News : धक्कादायक! ६५ वर्षीय वृद्धाचा चिमुकलीवर अत्याचार, घटनेने व्यक्त होतोय संताप…

Crime News : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
दारू पिऊन नशेत असलेल्या एका ६५ वर्षीय वयोवृध्दाने पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना रावेर तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.
वामन बळिराम घटे (वय.६५) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील पीडित चिमुरडी हि तिच्या आजीच्या घरी मागील एक महिन्यापासून राहत होती. दरम्यान १८ फेब्रुवारीला दुपारी घरात कोणीही नसताना संशयित वामन बळिराम घटे याने पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. Crime News
दरम्यान, संशयित हा गोलवाडे (ता. रावेर) येथील रहिवासी आहे. घडला प्रकार मुलीने घरात सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. त्यास रावेर न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.