Crime News : धक्कादायक! मानखुर्दमध्ये १२ वर्षीय मुलावर दारूच्या नशेत एका व्यक्तीने केला बलात्कार, तरुणाला अटक..


Crime News : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असताना मुंबईतील मानखुर्द येथून सगळ्यांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे.

एका २३ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत १२ वर्षाच्या मुलावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास घडली आहे.

शरद साबळे असे आरोपीचे नाव असून तो स्थानिक रहिवासी आहे.

सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगा भाजी खरेदी करण्यासाठी गेला असता आरोपीने त्याला मानखुर्दच्या सोनापूर येथील निर्जळस्थळी नेले आणि त्याच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडित मुलाने घरी परतल्यानंतर त्याच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबाना सांगितला.

पीडिताच्या कुटुंबाने तात्काळ मानखुर्द पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला असता तो मद्यधुंद अवस्थेत फिरताना दिसला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अको उर्फ शरद साबळे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी हा मानखुर्द येथील रहिवाशी असून तो नेहमी दारूच्या नशेत असतो, अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली. घटनेच्या दिवशीही आरोपी नशेतच होता, असे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!