Crime : उकळत्या पाण्यात तिखट मिरची टाकून आईने मुलावर फेकले पाणी, कारण वाचून बसेल धक्का, नेमकं झालं काय?

Crime : आई हे नाव ऐकताच आपल्या चेहऱ्यावर एक छान हास्य येतं. आईसोबतचे प्रेमळ, आनंदाचे क्षण आठवतात आणि चेहऱ्यावर हसू विलसत राहतं. पण आई हा शब्द ऐकताच एखाद्याला भीती वाटत असेल तर? आईच आपल्या पोटच्या गोळ्याच्या जीवावर उठली तर? सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
ठाण्यामध्ये एका आईने आपल्याच मुलावर उकळते पाणी ओतले. एवढेच नाही तर ते पाणी ओतण्यापूर्वी त्यात तिखट मिरीची देखील टाकली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.
आईला तिची सून पसंत नव्हती. मुलाने आपल्या पत्नीला सोडावे अशी तिची इच्छा होती. मात्र मुलगा यासाठी तयार नव्हता. आईला हे आवडले नाही आणि तिने आपल्या मुलावर मिरची पावडर मिसळलेले उकळते पाणी ओतले Crime
उल्हासनगरमधील बदलापूर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे साई वालावली गावात मोहन नावाचा व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहतो. त्याची आई आणि पत्नीही घरात एकत्र राहतात. मोहनच्या आईला तिची सून आवडत नसल्याचे सांगितले जात आहे.
सून आल्यानंतर घरात भांडणे सुरू झाल्याचे त्यांना वाटते. त्यांच्या घरातही जमिनीवरून वाद सुरू आहे. या सगळ्यासाठी मोहनची आई तिच्या सुनेला जबाबदार धरते. त्यांनी मोहनला अनेक वेळा पत्नीला सोडण्यास सांगितले. मात्र मोहनने तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. शुक्रवारी मोहनची पत्नी काही कामानिमित्त बाजारात गेली होती.
तेव्हा त्याच्या आईने मोहनला बसायला सांगितले, मी तुला जेवू घालते. मोहनही जेवायला बसला. पण त्याचे पुढे काय होणार आहे हे त्याला माहीत नव्हते. यावेळी मोहनच्या आईने पुन्हा आपल्या मुलाला पत्नीला सोडण्यास सांगितले. यावरून आई आणि मुलामध्ये वाद झाला. आणि आईने उकळते पाणी मोहनावर टाकले.
दरम्यान, यांनतर मोहन वेदनेने आरडाओरडा करू लागला नंतर शेजारचे लोक जमा झाले आणि मोहन ला तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.