आरजी कार बलात्कार प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा…

कोलकाता : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला शनिवारी विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं. आता या प्रकरणी आज सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
कोलकत्यातील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार हत्या प्रकरणात कोर्टाने संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षी सुनावली आहे. त्यामुळे आता संजय रॉयला मरेपर्यंत जेलमध्ये रहावे लागणार आहे. कोलकत्ताचे न्यायाधीश जस्टीस अनिर्बान दास यांनी हा निकाल दिला आहे.
तसेच पिडीतेच्या कुटुंबियांनी भरपाई घेण्यास नकार दिला आहे. खरं तर या प्रकरणात याधीच संजय रॉयला दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर आज या प्रकरणात संजय रॉय यांना शिक्षा सुनावण्यात येणार होती.
त्यानुसार आता कोर्टाने संजय रॉय यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पीडीतेच्या कुटुंबियांना १७ लाख भरपाई देण्यात येणार होती. मात्र पीडितेच्या कुटुंबियांनी भरपाई घेण्यास नकार दिला आहे.
आरजी कार बलात्कार हत्या प्रकरणात निकाल देऊन देखील कोर्टाबाहेर नागरीकांनी आंदोलन सूरूच ठेवलं आहे. खरं तर आंदोलकांनी या प्रकरणाक संजय रॉय सोबत अनेक आरोपी होती. त्यामुळे त्यांना देखील शिक्षा द्यावी,अशी मागणी आंदोलकांची आहे. या मागणीसाठीच निकालानंतर आंदोलक आंदोलन करत आहेत.