गणेश मूर्तीच्या किंमतीवरुन वाद; विक्रेत्याला मारहाण करुन स्टॉलची तोडफोड, हडपसर येथील घटना…

पुणे : गणेश मूर्तीच्या किंमतीवरुन वाद झाल्याने टोळक्याने विक्रेत्याला मारहाण करुन स्टॉलची तोडफोड केल्याची घटना हडपसर भागात घडली.
ही घटना हडपसर माळवाडी येथील एस एम जोशी कॉलेजजवळील स्टॉलवर रविवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मंगाराम टिकारामजी बावरी (वय ६५, रा. एस. एम. जोशी महाविद्यालयाजवळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन शिवराज गुजर (वय. १८), प्रसाद नारायण पाता (वय. १८), सूरज व्यंकटसुखया देवरेड्डी (वय. २०), कीर्ती पिल्ले (वय १९) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाख ल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी बावरी यांनी एस एम जोशी महाविद्यालयाजवळ गणेश मूर्ती विक्रीचा स्टॉल उभारला आहे. आरोपी मूर्ती खरेदी करण्यासाठी आले.
मूर्तीच्या किंमतीवरुन त्यांनी फिर्यादी यांच्याबरोबर वाद घातला. बावरी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. स्टॉलची तोडफोड केली. सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले तपास करत आहेत.