CNG Price : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा दिलासा! सीएनजी गॅसच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या…

CNG Price : सध्या सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण कमी होऊ शकतो. सीएनजी गॅसच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात कपात केली असून सीएनजीचे दर कमी केले आहेत.
महानगर गॅस लिमिटेडकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. वाहनांमधील नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढावे सीएनजीचे दर कमी केले आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे. यामध्ये मुंबईत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २.५० रुपयांची कपात केली आहे.
मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी केवळ ७३.४० रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात सीएनजीवर चालणारी वाहने आहेत. दरात घसरण झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येणाऱ्या काळात अजून दर कमी होतील अशी अपेक्षा आहे. CNG Price
पण पीएनजीच्या दरात कोणताही बदल केला नाही. सध्या लोकसभा निवडणुक जवळ आली आहे. यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
दरम्यान, सध्या सर्वसामान्य जनता महागाईने हैराण झाली आहे. महागाई कमी व्हावी यासाठी सतत आंदोलने केली जातात. पण काही केल्या महागाई कमी होत नाही. त्यात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेकजण इंधनाला पर्याय शोधत आहेत. आता काहीसा दिलासा मिळाला आहे.