Clothes : ब्रशने वाढवा आपल्या सुंदर कपड्यांचे आयुष्य..!

Clothes उरुळी कांचन : घरात काही कपडे Clothes असेही असतात की ते नेहमी धुणे शक्य नसते. उदा. बूलन कोट, जॅकेट, शाल, रेशमी कपडे, गालिचे, सतरंजी, कांबळे, टाय, हंट, स्कूलबॅग, हॅण्डबॅग इत्यादी. या वस्तू ब्रशने साफ करून त्या सुंदर राखू शकता.
सर्वप्रथम ब्रश करण्याचे योग्य ज्ञान असणे आवश्यक असते. माहितीविना ब्रश केल्याने कपड्यांचे वा वस्तूंचे तंतू ओढले जातात तर कधी ब्रशच नीट काम करीत नसतो. यासाठी प्रत्येक कपड्या- वस्तूनुसार ब्रश करा.
वूलन कपडे : वूलनचे कोट- जॅकेट इ. हँगरला लटकवून वरून खाली ब्रश करावेत. विशेषतः मुडपलेला भाग अवश्य ब्रश करावा. असे कपडे अंगातून काढल्यानंतर थोडा वेळ हँगरला लटकावून नंतर ब्रश करून कपाटात ठेवावेत. वूलन कपड्यांसाठी कपड्यांनुरूप ब्रश घ्यावा. ते ड्रायक्लीनिंग करण्यापूर्वीही ब्रश करावेत.
रेशमी कपडे : रेशमी कपडे नेहमी मुलायम ब्रशने साफ करावेत. हे कपडेही अंगातून काढल्यानंतर वाऱ्यावर टांगावेत. असे कपडे जास्त घासू नयेत.
गालिचा : गालिचा ज्या बाजूला कमी मळला असेल त्या बाजूने सुरुवात करीत ब्रशने साफ करावा. हळू हळू साफ करीत तो जास्त मळकट भागाकडे न्यावा. जास्त मळकट भाग दोन-चार वेळा जास्त साफ करावा.
सतरंजी व कांबळ : हे कधीही धोपटण्याने वा आपटून धुवू नयेत. यामुळे ते स्वच्छ होतात पण त्यांचे आयुष्य घटते. हे तारेवर लटकवून लांब दांड्याच्या ब्रशने साफ करावेत.
–
आणखी काही महत्वाच्या टिप्स :
हातांच्या सौंदर्यासाठी नखे सांभाळा नखे नेहमीच आपल्या हातांचे सौंदर्य वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावीत असतात.
नखांचे आकर्षण कसे टिकवावे हे जाणून घेऊया.
– जर आपल्याला दातांनी नखे कुरतडण्याची सवय असेल तर ती टाळा, कारण त्याचा नखांवर दुष्परिणाम होत असतो.
– शक्य असल्यास नेल हार्डनरचा वापर करू नका. यामुळे नखे कापणे कठीण जात असते.
– घरगुती उपायात नखे कोमट जैतून तेलात बुडवून त्यांची थोडीशी मालीश
करा. यामुळे त्यांची ग्रोथ वाढेल.
– नेहमी उत्तम प्रतीचे नेलपॉलिश लावावे. कारण खराब नेलपॉलिशचा रंग उतरत असतो. जर नखे पिवळी दिसली तर नखांवर प्रथम बेसकोट द्या. यामुळे नेलपॉलिशचा रंग नखांवर उतरणार नाही.
– नखे कॅरेटिन नावाच्या प्रोटीनपासून तयार होत असतात. याच्या पूर्ततेसाठी अंडी, दूध, दही, पनीर, व्हिटॅमिन ए, बी कॉम्पलेक्स, सुकामेवा यांचे सेवन करा.
– जर आपली नखे खूपच जास्त खराब व तुटकी असतील तर आपण कोणत्याही चांगल्या ब्यूटी क्लीनिकमध्ये जाऊन नेल कल्चर तंत्र करवून घेऊ शकता. यामुळे आपल्या नखांना योग्य आकार व लांबी मिळेल.