पॉक्सो प्रकरणी बृजभूषण यांना क्लीन चिट; दिल्ली पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल


नवी दिल्ली : भारतीय कुस्ती परिषदेचे सर्वेसर्वा आणि खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात पोक्सो नुसार दाखल गुन्ह्यासाठी समर्पक पुरावे आढळून येत नसल्यानं हे गुन्हे रद्द करावेत, अशी याचिका दिल्ली पोलिसांनी कोर्टाला केली आहे.

दरम्यान दिल्ली पोलिसांनी आज कुस्ती परिषदेच्या बृजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी त्यांनी क्लोजर रिपोर्ट म्हणजे सबळ पुराव्याअभावी गुन्ह्याचा तपास बंद करण्याची अनुमती कोर्टाकडे मागितल्याची माहिती आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले होते. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतलं. त्यावेळी क्रीडामंत्र्यांनी लवकरात लवकर तपास पूर्ण करुन कारवाई करण्याचे आश्वासन कुस्तीपटूंना दिले होते.

तेव्हापासूनच दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तपासाची सूत्रे वेगाने हलवण्यास सुरुवात केली होती. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अनेक कांगोरे तपासले आणि आज अखेर राऊज एवेन्यू कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांनी अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक छळ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांना क्लीन चिट दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!