आज बारावीचा निकाल होणार जाहीर! विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, ‘असा’ चेक करा रिझल्ट…


पुणे : आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. यामुळे याकडे विद्यार्थी आणि सर्व पालकांचे लक्ष लागले आहे. सोमवार 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता हा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे.

यामुळे 12 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यामध्ये गुणपडताळणी, उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 6 मे ते 20 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. याबाबत बोर्डाने माहिती दिली आहे. जाहीर होणाऱ्या या निकालावर विद्यार्थ्यांची पुढील दिशा ठरणार आहे. वर्षभर विद्यार्थी अभ्यास करत असतात.

अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला, वाणिज्य आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करत आहेत. सध्या स्पर्धा वाढल्याने मोठी चुरस निर्माण होत असते. राज्यातील जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांनी यंदा इयत्ता 12 वीची परीक्षा दिली होती.

यामध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. यामध्ये यंदा कोणता विभाग बाजी मारणार हे काही तासातच समजेल. सर्व विद्यार्थी आतुरतेने याची वाट पाहत आहेत.

बारावीचा निकाल पाहायचा असेल तर
1)https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
2) https://results.digilocker.gov.in
3) https://mahahsscboard.in
4) http://hscresult.mkcl.org
याठिकाणी तुम्ही निकाल पाहू शकता. यासाठी तुमचा नंबर आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!