कोयता गँगमधील मुलांना सुधारण्यासाठी सुधारगृहात ठेवले आणि पोरं पळून गेली, पुण्यातील घटना…


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला होता. याप्रकरणी अनेक मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. या मुलांना पुण्यातील येरवड्याच्या बालनिरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते.

 

असे असताना पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बालनिरीक्षणगृह याठिकाणी असलेल्या काही तरुणांनी पलायन केले आहे. यामुळे आता पोलिस तपास करत आहेत.

 

शहरातील विविध गुन्ह्यांचे आरोपी असलेले हे तरुण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी येरवाड्याच्या बालनिरीक्षणगृहात केली जाते. मात्र आता या मुलांनी पलायन केल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

दरम्यान, या बालनिरीक्षणगृहात या तरुणांची भांडणं झाली. काही तरुणांनी तिथे असलेली खिडकी फोडली आणि त्या ठिकाणी असलेल्या एका खोलीत खिडकीला शिडी लावली आणि तिथून पळ काढला आहे.

 

इम्रान शेख, अमन तिवारी, गौस कुरेशी, सुमित चंदमनीराम अशी या तरुणांची नावे आहेत. आरोपींना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक करून बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!