लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांचा दोन महिन्याचा अल्टिमेट; येत्या दोन महिन्यात….


पुणे : गेल्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये मोठ्या दणक्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता लाडक्या बहिणींना दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. आता लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात.सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात खात्यात येईल अशी माहिती सुद्धा समोर येत आहे. अशी सारी परिस्थिती असतानाच आता लाडकी बहिणी योजने संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक अल्टिमेटन दिला आहे.राज्य शासनाकडून महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.या शासन परिपत्रकानुसार आता या योजनेच्या सर्वच पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. येत्या दोन महिन्यांच्या काळात लाडक्या बहिणींना केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार अशी माहिती परिपत्रकातून समोर आली आहे.केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळणार नाही. यामुळेhttps://ladakibahin.maharashtra.gov.inया अधिकृत संकेतस्थळावर पात्र लाभार्थ्यांनी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन जाणकारांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 14 हप्ते मिळाले आहेत. जुलै 2024 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत महिलांना लाभ मिळाला आहे. आता सर्व महिलांचे लक्ष सप्टेंबर महिन्याच्या हफ्त्याकडे आहे. असे असताना आता पुन्हा लाडक्या बहिणींना सरकारचा केवायसी करण्याचा आदेश आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!