महापालिका निवडणुकांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठं विधान; म्हणाले, वेगळे लढलो तरी…


मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत व्हाव्यात, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. तसेच, या निवडणुका महायुती एकत्र लढेल. ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे.

त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीत वेगळे लढलो, तरी एकमेकांवर टीका-टिप्पणी करणार नाही; तसेच निवडणूक झाल्यानंतर आम्ही एकत्र येऊच’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत्या चार महिन्यांत घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी’मध्ये (यशदा) नगरविकास विभागाच्या वतीने आयोजित महापालिका आयुक्त व नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या निवासी कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी फडणवीस गुरुवारी पुण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

महापालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून लढवणार आहोत. आम्ही तिघे एकत्र असून, आमची महायुती आहे. काही ठिकाणी तुल्यबळ उमेदवार असेल, तर त्या जागा दोन्ही पक्षांना सोडता येत नाहीत. अशा अपवादात्मक परिस्थितीत एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू. शक्यतो, अधिकाधिक ठिकाणी महायुती म्हणूनच लढू, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे.

पाऊस जास्त असणाऱ्या भागासाठी आवश्यकता भासल्यास आयोग आणि राज्य सरकार निवडणुका पंधरा-वीस दिवस पुढे ढकलण्याची मागणी करतील. मात्र, या निवडणुका वेळेत पार पाडल्याच पाहिजेत, असा आमचा प्रयत्न आहे, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!