Chhagan Bhujbal : काल टीका आज भेट, राजकारणातील सर्वात मोठी बातमी, छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीला…

Chhagan Bhujbal : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे आज सकाळी अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे दाखल झाले.
छगन भुजबळ यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. छगन भुजबळ अचानक शरद पवार यांना भेटायला का आले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे. या भेटीच्या चर्चेदरम्यान अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी माहिती दिली आहे. Chhagan Bhujbal
भेटीवर उमेश पाटील म्हणाले, छगन भुजबळ हे जेष्ठ नेते आहेत. शरद पवार देखील राज्यासह देशातील मोठे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी छगन भुजबळ यांना विचारून जाण्याची आवश्कता नाही. राज्यात अनेकदा वेगवेगळ्या पक्षांचे नेते भेटायला जातात.
ते आपण सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही आता वेगळी भूमिका घेतली आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याआधी आम्ही निर्णय घेण्याआधी त्याची संपुर्ण कल्पना शरद पवारांना होती असं देखील उमेश पाटलांनी यावेळी म्हंटले आहे.