छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ तुळापूर, वढू बुद्रूक विकास आराखड्यासाठी ३९७ कोटी ४७ लाख रुपये मान्यता…!


मुंबई : पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम विकास आराखड्यांचे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात आले. या विकास आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे.

या कामांना अधिक गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ तुळापूर व वढूबुद्रुक या ठिकाणी ३९७ कोटी ४७ लाख रुपये खर्चाला मान्यता मिळाली आहे. तर तीर्थक्षेत्र जेजुरीसाठी १२७ कोटी २७ लाख रुपये खर्चाच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.तर सेवाग्राम आश्रमाला १६२ कोटींची मान्यता दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!