Chandrashekhar Bawankule : भाजपच्या विरोधात ‘बातमी’ येऊ नये म्हणून बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना मॅनेजचा सल्ला! बावनकुळेंचा पत्रकारांविषयी विधानाने वादंग.!


Chandrashekhar Bawankule अहमदनगर : पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना दर महिन्याला चहाला बोलवा, त्यांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा, असा सल्ला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आहे. (Chandrashekhar Bawankule)

भारतीय जनता पक्षाच्या ‘महाविजय २०२४ लोकसभा प्रवास’ या ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज्यभर फिरत आहेत. काल ते नगरला आले होते. (Chandrashekhar BawankuleChandrashekhar Bawankule)

यावेळी त्यांनी पदाधिकारी- कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या अभियानाची कार्यशाळा घेतली. यामध्ये त्यांनी आपल्या विरोधात बातम्या येऊ नयेत, यासाठी काय काळजी घ्यायची, यासंबंधी बोलताना धक्कादायक सल्ला दिला.

यावेळी बावनकुळे म्हणाले, ते म्हणाले, २०२४ ची लोकसभा निवडणूक होऊपर्यंत एकही बातमी आपल्या विरोधात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या या अभियानाच्या सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत. त्यासाठी आपण ज्या बुथवर काम करतो, तेथील सर्व पत्रकारांची माहिती मिळवा. त्या भागातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, स्वत:चे पोर्टल चालविणारे पत्रकार हेही पहावेत. आपण एवढे चांगले करीत असताना ते जणू बॉम्बस्फोट झाल्यासारखी बातमी देतात.

त्यामुळे आपल्या बुथच्या हद्दीत जे कोणी चार-पाच पत्रकार असतील त्यांची यादी तयार करा. त्यात सगळ्या मीडियाचे येतील असे पहावे. त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यालया बोलवा. त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे काय करायचे ते सनजलेच असेल. त्यात काही कमी जास्त झाले तर मदतीला खासदार विखे पाटील आहेतच, असेही बावनकुळे म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!