Chandrakant Patil : दौंडमध्ये विधानसभेला भाकरी फिरवणार? वासुदेव काळे यांना विधानसभेपुर्वी फोन येईल, चंद्रकांत पाटील यांचे मोठे वक्तव्य….
Chandrakant Patil : दौंडमध्ये कृषी महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच सोलापूर जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हस्ते फित कापुन कृषी महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
असे असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांना भविष्यात मोठे पद देणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी टाळ्या वाजवत याचे स्वागत केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, वासुदेवनाना काळजी करू नका, विधानसभेपूर्वी तुमच्या घराचा दरवाजा वाजवला, जाईल. नाना उठा फॉर्म भरायचा आहे. यामुळे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भाकरी फिरवण्याचे वक्तव्य केले आहे. वासुदेव काळे हे एक पुणे जिल्ह्यातील भाजपचे निष्ठावंत नाव आहे. Chandrakant Patil
त्यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. निष्ठावंत असून त्यांना पक्षाने वेळोवेळी हुलकावणी दिली असल्याचे बोलले जाते. मात्र आता चंद्रकांत पाटील यांनी यावेळी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांची कुठे वर्णी लागणार याची चर्चा दौडमध्ये सुरू आहे.
दरम्यान, याप्रसंगी जिल्ह्यातील शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना चंद्रकांत पाटील हस्ते कृषिभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिणचे सर्व पदाधिकाऱ्यांसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
तसेच शाळांमधील मुले व आवर्जून मुलींही मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकताच चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारच्या वतीने 12 वी नंतर मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली. त्याबद्दल शाळेतील मुलींनी त्यांचे आभार मानले.