Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यासमोर तरुणाचे धक्कादायक कृत्य, उडाली खळबळ, नेमकं काय घडलं?

Chandrakant Patil सोलापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हा नियोजन बैठकीसाठी सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांच्या ताफ्या समोर एका आंदोलकाने गावातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची तक्रार करत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात एकच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी या आंदोलक तरुणाला ताब्यात घेतले. Chandrakant Patil
दादा कळसाईत असे या तरुणाचे नाव आहे.
काय घडलं नेमकं?
चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते सोलापूरमध्ये विभागीय नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. परंतु, या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर मोठा गोंधळ झाला . एका व्यक्तीने चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. Chandrakant Patil
या तरुणाने गावातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांबद्दल तक्रार करत गोंधळ घातला. तालीम चोरीला गेली परंतु याची संबंधित अधिकाऱ्यांनाकडून दखल घेतली जातं नाही, असा आरोप करत या तरुणाने केला. त्याने आपल्या हातात जळत कोलीत घेऊन आंदोलन केले. पोलिसांनी तातडीने या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, बैठकीत चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, “लोकसभेची आचारसंहिता लागू शकते, त्या पूर्वी निधी संपवायचा आहे. आतापर्यंत ३८.७५ टक्के निधी खर्च झाला असून हे प्रमाण खूप कमी आहे.
अजून दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे, त्यात हा निधी खर्च होईल. पुढील वर्षीचा आरखडामध्ये आम्ही ८५५ कोटी रुपये मागणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.