Chandrakant Patil : सरकार महिलांना ४ तासांचा पार्ट टाईम जॉब आणि ११ हजार पगार देणार, चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा..


Chandrakant Patil : राज्यात महायुती सरकारकडून ‘लाडकी बहीण योजना’ राबवली जात आहे. योजनेचे पैसे लाडक्या बहीणींच्या खात्यावर जमा देखील करण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून या योजनेचा जोरदार प्रचार केला जातोय. अशात आता चंद्रकांत पाटील यांनी दोन मोठे निर्णय जाहीर केले आहे.

पुण्याच्या कोथरूडमध्ये ७ हजार पेक्षा अधिक मुलींचे महाकन्या पूजन संपन्न झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कन्या पूजन पार पडले. राज्यात प्रथमच असा भव्य-दिव्य कन्यापूजन सोहळा पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दोन मोठे निर्णय जाहीर केले.

दरवर्षी १ लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणार, अशी पहिली घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच १ नोव्हेंबर पासून १ हजार माता-भगिनींना ११ हजार मासिक वेतन मिळेल, अशी दुसरी मोठी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या या दोन घोषणांविषयी सविस्तर माहिती दिली. या नव्या घोषणेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या माध्यमातून सरकार महिलांना थेट टाटा कंपनीत जॉब देणार आहे. तसेच महिलांना एकवेळचं जेवण आणि नाष्टा देखील दिला जाणार असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून १ हजार माता-भगिनींना ११ हजार मासिक वेतन मिळेल, अशी नोकरी देणार, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दरवर्षी १ लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणार, अशी पहिली घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. तर, ११ हजार मासिक वेतन असणारी नोकरी देणार अशी दुसरी घोषणा त्यांनी महिलांसाठी केली आहे. या दोन घोषणा त्यांनी केल्या आहेत. Chandrakant Patil

महिला आणि कॉलेजच्या मुलींना चार तासांचे जॉब तयार झाले तर घराची जबाबदारी आणि कॉलेजची जबाबदारी सांभाळून मिळणाऱ्या २०-११ हजारांमध्ये त्या घर चालवायलाही योगदान देतील. महिलांना मुलं, पती, सासू-सासरे आणि स्वत:ची कामे करायची आहेत. दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास ती अशा परिस्थितीत असते की, सांगा आता काय करायचे आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.

टाटा कंपनीत महिलांना नोकरी देणार..

मी महिनाभर खूप इंडस्ट्रीजसोबत बोललो. एका इंडस्ट्रीने मला प्रतिसाद दिला. १ हजार जॉब ते पार्ट टाईम निर्माण करणार आहेत. उद्या त्या जॉबचे प्रातिनिधिकपणे दोन जणांना अपॉईंटमेंट लेटर देणार आहोत. त्यानंतर जाहीरात काढणार, अर्ज येतील, मुलाखती होतील. ११ हजार रुपये पगार आणि दोन्ही वेळेला जाणे-येणे फ्री. ते इंडस्ट्रीत येणार आहेत. एकवेळचा नाष्टा आणि एकवेळचं जेवण फ्री, असा कमालीचा इंडस्ट्रिलिस्ट सापडला.

मी या निमित्ताने त्या त्यांचे नाव सांगेन. दुर्दैवाने नुकतंच त्यांचं निधन झालं. अशा स्वर्गीय रतन टाटा यांच्या टाटा समूहाने मला ऑफर दिल्यामुळे यापुढे मुली आणि महिलांना ११ हजार रुपये मासिक वेतन असणारी थेट टाटामध्ये नोकरी मिळणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!