CBSE 12 th Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर, निकालात मुलींचीच बाजी, असा पाहा निकाल…

CBSE 12 th Result 2024 दहावी, बारावीची परीक्षा यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात झाली होती. विद्यार्थी आता निकालाची वाट पाहत आहेत. सोमवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाचा 2024चा बारावीचा निकाल 87.98 टक्के लागला आहे.
यंदाही मुलींना बाजी मारत मुलांना मागे टाकले आहे. सीबीएसई बोर्डात यंदा 90 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. CBSE 12 th Result 2024
CBSE 12th बोर्ड निकाल 2024
मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी – 91.52
मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी – 85.12
ट्रान्सजेंडरची उत्तीर्ण टक्केवारी – 50.00
निकाल असा तपासा..
बोर्डाचा बारावीचा निकाल असा तपासा
CBSE बोर्डाचा results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
मुख्यपृष्ठावर, ‘CBSE 12वी निकाल थेट लिंक’ वर क्लिक करा.
लॉगिन पृष्ठ उघडेल, येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
तुमचा CBSE बोर्ड निकाल स्क्रीनवर उघडेल, तो तपासा.
विद्यार्थी येथून निकालाची डिजिटल प्रत डाउनलोड करू शकतील आणि ती त्यांच्याकडे ठेवू शकतील.