मालवाहतूक वाहनाची दोन दुचाकींना धडक! एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू…!


जुन्नर : नगर-कल्याण महामार्गावर एका अपघाताची माहितीसमोर आली आहे. नगर-कल्याण महामार्गावर आळे फाट्याजवळील लवणवाडी (ता. जुन्नर) येथे मालवाहतूक वाहनाने दोन दुचाकींना धडक दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , या अपघातामध्ये दुचाकींवरील पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जण पारनेर तालुक्यातील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे.

 

 

 

 

 

अपघात एवढा भीषण होता की ,या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन चिमुकल्यांसह तीन जणांचा समावेश आहे. हा अपघात सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!