फिरण्यासाठी आले अन् दुःखद घडलं!! मुळशी धरणात दोन जणांचा बुडून मृत्यू…

पुणे : मुळशी तालूक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवार सुट्टीनिमित्त मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा मुळशी धारणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील वारक चाचीवली या गावाच्या हद्दीत आज सकाळी ११.३० च्या सुमारस घडली आहे. विशाल रवी राठोड (वय.१८) आणि अनिश मनोरंजन राऊत (वय.१९) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. विशाल हा फत्तेचंद कॉलेज, थेरगाव या महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तर अनिश हा डी वाय पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
काल रविवार सुट्टीचा दिवस असल्याने विशाल आणि अनिश आपल्या मित्रांसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी आले होते. यावेळी चाचीवली गावच्या हद्दीत मुळशी धरणात पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान विशालला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. मात्र त्याला पकडण्यासाठी अनिश पाण्यात उताराला. मात्र एकमेकांना वाचवण्याच्या नादात दोघेही पाण्यात बुडाले.

पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव, पौड पोलहस व आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे व पथक, हिंजवडी येथील स्क्युबा डायव्हींगचे पथक त्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत दोघेही सापडून न आल्याने शोध मोहिम थांबविण्यात आली. या दोघांचा शोध पुन्हा सोमवारी (ता.१७) सकाळपासून घेण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.