घरात बोलवलं, बेडवर ढकललं आणि…अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अलिबागमधील घटनेने महाराष्ट्र हादरला

पुणे : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ अलिबागमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मित्रासोबतचा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणाने पीडितेला घरी बोलावून तिच्यासोबत गैरवर्तन केले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, हा धक्कादायक प्रकार १ मे २०२४ ते १९ ऑक्टोबर २०२५ या प्रदीर्घ कालावधीत घडला. आरोपी तरुणाने पीडितेचा तिच्या एका मित्रासोबत असलेला फोटो मिळवला होता. हा फोटो कुटुंबियांना दाखवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला वारंवार आपल्या घरी बोलवत असे.

याच धमकीचा वापर करून त्याने एके दिवशी मुलीला घरी बोलावले. घरात कोणी नसताना त्याने दरवाजाला आतून कडी लावली आणि तिला बळजबरीने बेडवर ढकलून दिले. आरोपीने तिच्या शरीराला अश्लीलपणे स्पर्श करत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

या छळाला कंटाळून अखेर पीडित अल्पवयीन मुलीने अलिबाग पोलीस ठाण्यात (Alibaug Police Station) धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS 2023) नुसार कलम ७५, ७६, ७७, ७८, ७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.