उरुळी कांचन येथील डॉक्टरांच्या घरी चोरी; अट्टल चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांनी २४ तासाच्या आत ठोकल्या बेड्या..


उरुळी कांचन : उरुळीकांचन (ता. हवेली) येथील घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला २४ तासांच्या आत लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून ४ लाख ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राजकुमार ओकांरआप्पा आपचे वय २८ वर्षे, धंदा मजुरी, मुळ रा. कोथळी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद, सध्या रा. होम मेट सोसायटी आपुलकी बार समोर, महादेवनगर, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. डॉ. किरण सुहास शिंदे, वय ३७ वर्षे, धंदा डॉक्टर रा. फ्लॅट नं १४ विंग- सी / १, स्वरगंधा सोसायटी) असे फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या राहते फ्लॅटचा कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश करुन सोन्याचे दागीणे व रोख रक्कम असा किंमती मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करुन चोरी करुन नेला. म्हणुन लोणी काळभोर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद आहे.

 

पोलिसांनी उरुळी कांचन ते हडपसर असे सुमारे २५० सी सी टी व्ही फुटेज चेक करुन, तांत्रीक विश्लेषण व गोपनिय बातमीदाराचे आधारे अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असता तपास पथकातील पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक दिवसापुर्वी उरुळी कांचन येथील बंद घरातुन चोरी करणारा इसम हा कवडीपाट टोलनाका, पुणे या ठिकाणी असुन त्याने अंगात निळ्या रंगाचा हाफ भायाचा टि शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे.

सदरची माहिती पोलिसांना मिळताचस कवडीपाट टोलनाका येथे रस्त्याचे कडेला कोणाची तरी वाट पाहत इसम असलेला दिसला पोलिसांनी चाहुल लागताच तो सदर ठिकाणावरुन पळुन जावु लागल्याने त्याचा पाठलाग करुन थोड्याशा अंतरावर त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर राजकुमार ओकांरआप्पा आपचे वय २८ वर्षे, धंदा मजुरी, मुळ रा. कोथळी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद, सध्या रा. होम मेट सोसायटी आपुलकी बार समोर, महादेवनगर, हडपसर, पुणे) असे त्याचे नाव आणि पत्ता सांगितला. त्याची कसून चोकशी केली असता त्याने सदर गुन्ह्या व्यतिरीक्त खालील गुन्ह केल्याचे उघडकीस आले असुन सर्व गुन्हयामधील चोरीस गेले एकुण त्याच्याकडून ४ लाख ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच त्याने या गुन्हया व्यतिरीक्त पुणे शहर, पिंपरी चिंचवड, व पुणे जिल्हा परिसरात आणखी १० ते १२ घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे सांगत असून त्या दृष्टीने अधिक तपास चालु आहे.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवलदार सातपुते, नितीन गायकवाड, सायकर, बोरावके, जाधव, नागलोत, शिरगीरे, कुदळे, वीर, सोनवणे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!