पूर्व हवेलीत सोलापूर रस्त्यावरील ग्रामपंचायतींची कचऱ्याची समस्या निघणार कायमची ‘निकाली’; PMRDA थेऊरला उभारणार 150 टनी प्रक्रिया प्रक्रिया; आमदार ज्ञानेश्वर कटकेंचा प्रयत्नांना मिळणार यश…


उरुळीकांचन : पूर्व हवेलीतील वाढत्या नागरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर होत असताना, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) यावर दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. थेऊरसह परिसरातील 13 गावांसाठी (14 ग्रामपंचायती) अत्याधुनिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास PMRDA ने मंजुरी दिल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी दिली.

या प्रकल्पासाठी तब्बल 10 एकर गायरान जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.या प्रकल्पात थेऊर, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, केसनंद, वाडेबोल्हाई, उरुळी कांचन, साष्टे, कोरेगाव मूळ, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची, नायगाव प्रयागधाम, शिंदवणे, पेठ आणि कोलवडी या गावांचा समावेश आहे.

या प्रकल्पाची माहिती देताना आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले की, PMRDA आयुक्त अभिजीत चौधरी यांना गत महिन्यात पूर्व हवेलीच्या कचऱ्याच्या घनतेची माहिती प्रत्यक्ष पाहणी करुन दिली होती. वाढते शहरीकरण व कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीची निमुष्की यावर उपाय म्हणून PMRDA ने संयुक्त प्रकल्प उभारुन भविष्यात कचरा समस्येची घनता पाहून कचऱ्याचा प्रकल्प उभा रहावा म्हणून मागणी करण्यात आली होती

या समस्येवर भविष्याचा विचार करुन सन 2043 पर्यंतची गरज लक्षात घेऊन या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. या प्रकल्पात दररोज 150 टन (TPD) कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे.

प्रकल्पाच्या ठिकाणापासून 20 किलोमीटरच्या परिसरातील ग्रामपंचायतींना या योजनेत सहभागी होता येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींना आपल्या भागातील कचरा गोळा करून तो प्रकल्पस्थळापर्यंत पोहोचवावा लागेल. तसेच, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली ‘टिपिंग फी’ PMRDA कडे जमा करावी लागणार आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतींनी मासिक बैठकीत किंवा ग्रामसभेत मंजुरीचा ठराव पारित करून PMRDA कडे पाठवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, ग्रामीण भागात रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांवर कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या. आता PMRDA च्या या उपक्रमामुळे पूर्व हवेलीतील कचऱ्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असून, परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!