कोरेगावमूळ येथील वीस वर्षीय तरुणीचा निर्घृण खून ; प्रकरणाचा अद्याप उलगडाच नाही ; न्याय व्यवस्था गरीबांना नाही काय, सामाजिक बुरखा घातलेले विरोधी पक्ष, सामाजिक संघटना अनभिज्ञच…..

उरुळी कांचन : कामावरुन परतणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या झाल्यानंतर या खून प्रकरणाला पाच दिवसांचा अवधी उलटून गेल्यानंतरही उरुळी कांचन पोलिसतसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला या खून प्रकरणातीलआरोपीला गजाआड करण्यात अपयश आले असून पोलिसांना या खूनप्रकरणाचा अद्याप उलगडा होऊ न शकल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या वीस वर्षीय तरुणीची हत्या होण्याचा इतका संवेदनशील मुद्दा असूनही विरोधी पक्ष, महिला सुरक्षेच्या नावाखाली ओरडण्याऱ्या महिला संघटना तसेच मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक संघटना या गंभीर प्रकरणाकडे डोळेझाक करीत असल्याचा संताप व्यक्त करीत आहे.


पुनम विनोद ठाकूर (वय -२०, रा.कोरेगामूळ, ता.हवेली, जि.पुणे ) असे निर्घृण खून झालेल्या तरुणीचे नाव असून ती उरुळीकांचन येथुन खाजगी कामावरुन येताना दबा धरुनबसलेल्या अज्ञात व्यक्तीने तिच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या खूनाचा प्रकार मंगळवार(दि १४) रोजी घडला असून या निर्घृण खून प्रकरणाला पाचदिवसांचा कालावधी उलटूनही पोलिसांना या खूनप्रकरणाचा,उलगडा करण्यात अपयश आले आहे.

कोरेगावमूळ येथील मोलमजुरी करुन उदरनिर्वाहकरणाऱ्या या कुटूंबातील ही तरुणी उरुळीकांचन येथील एकाखाजगी औषध विक्री दुकानात काम करीत होती. ती कामावरूनघरी परतत असताना खूनासाठी दबा धरुन बसलेल्या अज्ञाताने अतिशय शातीर पद्धतीने तिचा निर्घृण खून केला आहे. दरम्यान या खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी उरुळीकांचन पोलिसठाण्याचे नव्याने प्रभारी पदाची सूत्रे स्विकारलेले पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या खूनप्रकरणातील तपास सुरू असला तरी अद्याप पोलिसांच्या हाती भोपळा लागल्याने या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस सुस्त आहेत काय असासवाल उपस्थित होत आहे.दरम्यान वीस वर्षीय तरुणीची इतक्या निर्घृण पध्दतीने हत्या होऊनही या संवेदनशील खून प्रकरणाचा मुद्दा विरोधी पक्षांना का उठविता आला नाही ? की विरोधी पक्षांना राजकीय भांडवल करण्यासाठी हा मुद्दा आवश्यक वाटला नाहीअसा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. महिला सुरक्षिततेच्या नावाखाली गळा काढणाऱ्या संघटना या ठिकाणी फिरकल्या नसून महिला सुरक्षिततेचे हित हरपल की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
” या खूनप्रकरणाचा तपास दृष्टीक्षेपात असून,पोलिस योग्य दिशेने तपास करीत आहे. खूनप्रकरणात आरोपीला,लवकरच अटक करण्यात येणार असून त्यासाठी उरुळीकांचन,तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ९ पथक तपासात सक्रियआहे. खूनाचा उलगडा पोलिस लवकरच करतील”
-सचिन वांगडे, पोलिस निरीक्षक, उरुळीकांचन पोलिस ठाणे .
