वहिनी अंघोळ करताना दिर व्हिडिओ काढत होता, तेवढ्यात….!! पुण्यातील नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने उडाली खळबळ..

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी दिर-वहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. चुलत वहिनी अंघोळ करत असताना, दिर व्हिडीओ शूटिंग करायला आला.

यावेळी वहिनीच्या लक्षात आल्याने प्रकार उघडकीस आला आहे. वहिनीच्या लक्षात ही बाब आल्यानं दिराची विकृती समाजासमोर आली. शेल पिंपळगावात आज सकाळी ही घटना घडली आहे. याबाबत अजून काही व्हिडिओ या नराधमाकडे आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणी चाकण पोलिसांनी नराधम चुलत दिराला ताब्यात घेतले आहे. विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरु आहे. यामुळे मात्र मोठी खळबळ उडाली असून नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, अशा प्रकारे राज्यात विकृती वाढत असून कुंभ मेळ्यात देखील महिला अंघोळ करतानाचे व्हिडिओ काढून ते विकले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक केली असून ही घटना ताजी असतानाच हा संतापजनक प्रकार पुण्यात घडला आहे.
