ब्रिजभूषण आक्रमक ! लैंगिक आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल…!

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी आपल्या याचिकेत विनेश फोगट आणि साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटूंची नावे आरोपी म्हणून ठेवली आहेत.
आपल्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांविरोधात त्यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, कुस्तीपटूंनी लैंगिक छळ कायद्याचा गैरवापर करून न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवली आहे. कोणत्याही कुस्तीपटूवर लैंगिक अत्याचार झाला असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करून न्यायालय व कायदेशीर प्रक्रियेद्वारे न्याय देण्याची मागणी करायला हवी होती.
याचिकेत विनेश फोगट, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक खेळाडूंविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे म्हटले आहे. त्यांनी कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करून कुस्ती संघटनेच्या प्रमुखाला राजीनामा देण्यास भाग पाडले अशा शब्दात पैलवानांवर आरोप केले आहेत.
याचिका दाखल केल्यानंतर अधिवक्ता शारिकसंत प्रसाद यांनी सांगितले की, या प्रकरणातील याचिकाकर्ता विकी हा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे अधिकृत निवासस्थान 21 अशोक रोड येथे येथे राहतो आणि त्यांचा स्वयंपाकी म्हणून काम करतो. आंदोलक खेळाडूंनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचे गंभीर आरोप जाहीरपणे करून ब्रिजभूषण यांच्या प्रतिष्ठेला आणि सन्मानाला कलंकित केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.