ब्रेकिंग!लाडक्या बहिणींच्या हप्त्याला लागणार ब्रेक? संक्रातीच्या आनंदावर विरजण, काय आहे कारण?

पुणे : महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला 14 आणि 15 जानेवारी रोजी 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण आता या हप्त्याला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या संक्रातीवर विरजण येणार आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच लाडक्या बहिणीच्या खात्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्यात येणार होते. मात्र मतदान असल्याने या हप्त्याला काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. महिला मतदारांना प्रभावित करण्यासाठीच मकर संक्रांतीचं निमित्त करुन हा हप्ता वितरीत करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या या हप्त्यावर काँग्रेसने आक्षेप घेणारे पत्र ही राज्य निवडणूक आयोगाला पाठवले आहे.
महापालिकेची निवडणूक झाल्यावर लाडकी बहीण योजनेचा निधी वितरीत करण्यात यावा अशी मागणी निवडणूक आयोगाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.त्यामुळे आता या हप्त्याला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसने या लाडक्या बहिणीच्या हप्त्यावर आक्षेप घेताच भाजपनेही त्याच्यावर जोरदार टीका केली आहे.काँग्रेस लाडकी बहिणींचा द्वेष करत असल्याचा आरोप महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. या योजनेविषयीचा काँग्रेसचा राग वारंवार उफाळून आल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या आधी हप्ता मिळणार की नाही हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
