Breaking News : अतिशय भीषण अपघात, १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या अन्…


Breaking News : पंजाबमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लुधियाणामधील खन्ना येथे १०० वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात अनेक वाहनांची मोडतोड झाली. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी भीषण अपघात झाला आहे. या कालावधीत सुमारे 100 वाहनांचे नुकसान झाले आहे. अनेक वाहनांची मोडतोड झाली. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरु आहेत. या अपघातात पंजाब रोडवेजच्या बसचाही समावेश आहे. मोठ्या प्रमाणात वाहने आदळल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांनी खराब झालेली वाहने एका बाजूला काढून वाहतूक सुरू केली. या अपघातात जीवितहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीही झाली आहे. Breaking News

दरम्यान, सुमारे २०-२५ किलोमीटर अंतरावर वाहने एकमेकांवर आदळली. धुक्यामुळे समोरचं दिसत नसल्याने मागून येणाऱ्या गाड्या धडाधड एकमेकांवर आदळल्या आणि हा भीषण अपघात झाला.

मोठ्या प्रमाणात वाहने एकमेकांवर आदळल्याने रस्त्यावर काही काळ वाहतूक कोडींची समस्याही निर्माण झाली होती. प्रशासन आणि पोलिसांनी खराब झालेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. या अपघातात जीवितहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीही झाल्याची माहिती समोर येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!