Breaking News : आता शरद पवार राजकारणात धमाका करणार? काँग्रेसमध्ये करणार पक्ष विलीन? महत्वाची माहिती आली समोर..

Breaking News : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिल्यामुळे शरद पवार नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत, असे बोलले जात आहे. शरद पवार गटाकडून मात्र याबाबतचा दुजोरा देण्यात आलेला नाही.

पवार यांना काँग्रेसचे नेते मंगळवारी भेटले होते. त्यानंतर आज शरद पवार यांनी आपल्या गटातील सर्व नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर शरद पवार मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. Breaking News


दरम्यान, लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी पक्षाची पुण्यात महत्वाती बैठक बोलवली आहे. शरद पवार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे,रोहित पवार,अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक सुरू आहे.