ब्रेकिंग ! चांदणी चौकातील वाहतूक 10 एप्रिलपासून बंद राहणार…!


पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन १ मे रोजी होणार आहे. चांदणी चौकातील जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालं आहे.

 

१५ ते २० एप्रिल दरम्यान गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.

 

गर्डर टाकण्याच्या कामासाठी दोन दिवस चांदणी चौकातील वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. चांदणी चौकातून दुसरीकडे जाणाऱ्या सर्विस रोडचे काम आता पूर्ण झाले आहे.

 

 

१० एप्रिलला चांदणी चौकातील सर्विस रोड सुरू होतोय. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक या दोन पर्यायी मार्गाने वळवण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्या अनुषंगाने लवकरच परिपत्रक शासनाकडून जाहीर करण्यात येईल.

 

या पर्यायी मार्गांनी प्रवास सुरु 

मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. याशिवाय बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या सेवा रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून,१० एप्रिलपासून हे रस्ते वाहनचालकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे ‘एनएचएआय’कडून सांगण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!